Tuesday, February 6, 2024

खेळातून शिक्षण



 खेळातून शिक्षण 

श्री.सतिश पांडुरंग मुणगेकर  

तंत्रस्नेही विषय शिक्षक 

जि. प. पू. प्रा. आदर्श केंद्र शाळा चिखली नं.१ 

तालुका -गुहागर, जिल्हा - रत्नागिरी.

मोबा. नं.७०५८९१९०७८ / ८९७५१०८५७०


* उपक्रमाचे नाव - खेळातून शिक्षण


* उपक्रमाचा हेतू - 

१) नाविन्यपूर्ण पद्धतीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने इंग्रजी विषयाची गोडी वाढवणे २) इंग्रजी विषयाची भीती दूर करणे ३) इंग्रजी शब्द रचना विषयी ज्ञान होणे ४) आनंददायी खेळातून शिक्षण देता येणे ५) मेंदूला चालना देता येणे ६) विचार क्षमता वाढविणे ७) मुलांना रंजक शिक्षण देणे.

* पूरक साहित्य - मोबाईल, लॅपटॉप, संगणक, प्रोजेक्टर

* उपक्रम कालावधी - अनिश्चीत कालावधी. कोणत्याही वेळेमध्ये विद्यार्थी शाळा व घर यामध्ये त्याचा वापर करू शकतो.

* नियोजित वेळापत्रक - ॲप मध्ये दिलेले शब्द त्या विद्यार्थ्याला आत्मसात होईपर्यंत.

* कृती/ कार्यवाही - 

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांनाच मोबाईल हवाहवासा वाटत आहे. त्यातून आपल्या मराठी शाळेतील विद्यार्थी सुद्धा मागे कसे राहतील यासाठी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड निर्माण व्हावी तसेच इंग्रजी शब्द वाचण्याची गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने ह्या वर्षी मी शैक्षणिक ॲप तयार करून खेळातून शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि तो साध्य ही  झाला कारण माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल मध्ये माझे शैक्षणिक ॲप ते वापरत आहेत व त्याचा वापर करत आहेत. माझ्या word challenge व Crossword या शैक्षणिक ॲप मध्ये विद्यार्थ्यांसाठी काही इंग्रजी शब्दकोडी आहेत त्यामध्ये प्राणी, पक्षी, फळे, रंग, आकार, फुले यांची नावे लपलेली आहेत. विद्यार्थ्यांनी एका मिनिटांमध्ये ती नावे शोधायचे आहेत. शब्दकोड्यांमध्ये नावे उभी आडवी तिरकी अशी लपलेले आहेत. विद्यार्थ्यांनी ते कमी वेळामध्ये शोधायची आहेत

अभ्यासदौरा